अन त्याच्या खात्यात जमाझाअली नुकसान भरपाईची रक्कम

अन त्याच्या खात्यात जमा झाली  नुकसान भरपाईची रक्कम



वेबटीम श्रीगोंदा दि.११ - मागीलवर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने त्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे तहसील कार्यालयात जमा होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले मात्र ढोरजे येथील शेतकऱ्यांचे भानगाव एथील सहकारी बँकेच्या शाखेत ज्या शेतकऱ्यांचे खाते होते त्यांचे खाते नंबर अपुर्ण असल्यामुळे नुकसानीची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने तालुक्यातील सगळ्यांना पैसे मिळाले पण ढोरजे गाव उपाशीच राहिले होते. याबाबत वारंवार पाठपुरावा करून सदरील चुक दुरुस्त केली जात नसल्याने तहसीलदार महेंद्र माळी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार माळी यांनी सदरील चुक तातडीने दुरुस्त करण्याचा आदेश दिल्याने ३०० शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे २२ लाख रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.याबत मनसे तालुकाध्यक्ष अमोल कोहक, काशी विश्वनाथ देवस्थानचे अध्यक्ष सोन्याबापु वाणी , शिवराज व्यवहारे, अनिल टकले, शिवाजी वाणी यांनी तहसील कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला होता.

Post a Comment

0 Comments