सरकार , स्वस्त धान्य दुकानदार यांच्या खेळीत ग्राहकांचा फुटबॉल
एक तर स्वस्त धान्याची दुकाने दिवसभर उघडी राहतील व त्यात मुबलक धान्य साठा असेल असे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले मात्र याही ठिकाणी परिस्थिती विपरीत दिसती एकतर स्वस्त धान्य दुकाने हि बहुतांश वेळा बंदच असतात आणि समझा ती उघडी असलीच तर धान्य आले नसल्याचे कारण सांगून ग्राहकांना टाळण्यात येते अथवा तुमचे आधार लिंक नाही , तुम्ही या योजनेत बसत नाहीत अशी नानाविध कारणे सांगितली जातात . परिस्थिती आज शहरात पाहायला मिळते . वास्तविक पाहता प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ सशुल्क तसेच ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असून या योजनेसाठी लागणारा धान्य साठा गोदामात उपलब्ध आहे असे सांगून एप्रिल महिन्याचे धान्य ग्राहकांना देण्यात आल्याची माहिती धान्य वाटप विभागाचे अधिकारी सुनील सौंदाणे यांनी दिली. जिल्ह्यात एकूण ८४१ क्विंटल गहू , ४८५ क्विंटल तांदूळ ,१२. ११ क्विंटल डाळ आणि ५.६८ क्विंटल साखर इतका शिधा पोहोचला असून एप्रिल महिन्यातील धान्याचे वितरणही झाले आहे. गाव पातळी वरील स्वस्त धान्य दुकानदारांना प्राधांन्यक्रम ठरवून दिला असून सर्वात अगोदर गरजू घटकाला धान्य वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.मात्र असे असले तरी वाटप सह अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती खरी कि दुकानदार सांगतात ती माहिती खरी या बाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
0 Comments