शुक्रवार बाजारला राम मंदिराच्या पटांगणात सुरवात

           शुक्रवार बाजारला राम मंदिराच्या  पटांगणात सुरवात 

वेब टीम नगर ,दि. २८- जीवनाश्यक वस्तूंमध्ये फळ व भाजीचा समावेश असल्याने भिंगारमध्ये फळ-भाजीचा समावेश असल्याने भिंगारमध्ये फळ-भाजी विक्रीची व्यवस्थेला मनाई करू नये, अशी सूचना कॅन्टोन्मेंट बोर्ड व  पोलिस प्रशासनाला करू, असे आश्‍वासन निवासी उपजिल्हाधिकारी सागर पाटील यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिलेहोते त्यानुसार . फळभाजी विक्रीसाठी राममंदिराच्या   पटांगणात बसण्यासाठी कॅन्टो. बोर्डाने या पटांगणासठी साफ सफाई करून पांढरे पट्टे ही आखून दिले. त्यात दोन दुकानांमधील अंतर दोन ग्राहकांमधील अंतर निश्चित करण्यात आले.
हाप्रश्न भिंगार काँग्रेसने उपस्थित केला होता .त्याची  दखल घेतल्या बद्दल प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी आर.आर. पिल्ले ,शाम वाघस्कर, निजाम पठाण, रिझवान शेख ,संतोष धीवर ,विवेक येवले ,संजय झोडगे आदी उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments