नगरकरांची करोना मुक्ती कडे वाटचाल


नगरकरांची करोना मुक्ती कडे वाटचाल

 आणखी 11 व्यक्तींचा 'कोरोना संसर्ग' अहवाल निगेटीव


    वेब टीम  नगर, दि. २७ -  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे गुरुवारी रात्री पाठविलेल्या ११ स्त्राव नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटीव आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान आता आणखी ०७ स्त्राव नमुन्यांचे अहवाल येणे बाकी असून यात सर्वप्रथम बाधित झालेल्या रुग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल शुक्रवारी उशीरापर्यंत येण्याची अपेक्षा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   

   जिल्ह्यातील डिझेल विक्रीची वेळ वाढवली  जिल्हा प्रशासनाकडून सुधारित आदेश जारी         जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पेट्रोल विक्री ही दि. २७ मार्च ते १४ एप्रिल, २०२० या कालावधीत पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तर डिझेल विक्री याच कालावधीत पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यापूर्वी पेट्रोल व डिझेल विक्री पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंतच सुरु होती. मात्र, सुधारित आदेशाद्वारे हा बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांसाठी येणारी वाहने, दूध टॅंकर, शेती कामांसाठी वापरण्यात येणारी वाहने आदींसाठी सुविधा व्हावी, म्हणून ही वेळ वाढविण्यात आली .

Post a Comment

0 Comments