काळजी घेतल्यास कोरोना व्हायरसचा मुकाबला करता येऊ शकतो


काळजी घेतल्यास कोरोना व्हायरसचा मुकाबला करता येऊ शकतो

 शांताराम राऊत - महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे वतीने सलून व्यावसायीकांना मास्क चे वाटप 

     वेब टीम नगर ,दि. १९ -  सध्या जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने
सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. परंतु नागरिकांनी घाबरुन न जाता
योग्य काळजी घेतल्यास या व्हायरसचा मुकाबला करता येऊ शकतो. सलून
व्यवसायिकांचा अनेक ग्राहकांशी जवळचा संबंध येत असल्याने त्यांच्या
आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच या व्हायरसचा इतरत्र फैलाव होवू नये,
यासाठी सलून व्यवसायीकांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर काय
काळजी घ्यावी, या विषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांनी केले.

     कोरोना विषाणूवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र नाभिक
महामंडळाच्यावतीने शहरातील सलून व्यवसायिकांना मास्कचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, प्रदेश कार्य.सदस्य विकास मदने,
सलून असो.चे उपाध्यक्ष अजय कदम, अशोक खामकर, सुनिल खंडागळे, बापू
क्षीरसागर, किशोर मोरे राजू भुजबळ आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी विकास मदने म्हणाले, नाभिक महामंडळाच्यावतीने सलून
व्यवसायिकांच्या विविध प्रश्‍नांसाठी काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून
सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितचा सामाना सर्वांनी एकजुटीने करण्यासाठी
कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी व्यवसायिकांना मास्कचे वाटप केले
आहे. नागरिकांनीही कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवता, शासनाने घालून
दिलेल्या नियम व निर्देशानुसार काम करावे, असे आवाहन केले.

     यावेळी सुनिल शिंदे, शहाजी कदम, मनिष शिंदे, भाऊ मदने, दिपक
फुलपगार, आदिनाथ रायतळे, युवराज राऊत, संतोष ताकपेरे, दत्ता कदम,
भाऊसाहेब काळे, सुदर्शन कोडूर, महेश मोरे, रामचंद्र रायतळे व नाभिक
व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments