खासदार अमोल कोल्हेंची ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘SUMAN M’ पद्धत


खासदार अमोल कोल्हेंची  ‘कोरोना’पासून बचावासाठी

‘SUMAN M’ पद्धत

वेब टीम मुंबई ,दि. १८- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४२वर पोहोचली  आहे. पुण्यात सर्वाधिक १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. खासदार अमोल कोल्हे ‘कोरोना’पासून बचावासाठी एक भन्नाट आयडिया सुचवली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केला आहे.

“हात धुवा, हात धुवा, हात धुवा, असे धुवा, तसे धुवा, ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? ऐकण्याचा कंटाळा येऊ द्या, हात धुण्याचा मात्र कंटाळा करु नका, असे अमोल कोल्हेंनी या व्हिडीओत म्हटलं आहे.

अमोल कोल्हेंनी यात एक भन्नाट आयडियाही सुचवली आहे. “अत्यंत सोपी आणि साधी हात धुण्याची पद्धत आहे. त्यासाठी SUMAN M’ हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हे चाललं पाहिजे. S – सरळ, U- उलट, M – मूठ, A- अंगठा, N – नखं आणि M म्हणजे मनगट,” असे अमोल कोल्हे म्हणाले.

Post a Comment

0 Comments