मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा, शिवसेेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा,

 शिवसेेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

महाविकासआघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (७ मार्च) अयोध्या दौऱ्यावर  आहेत.

वेब टीम मुंबई,दि. ७ - महाविकासआघाडी सरकारला१०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (७ मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, अनेक नेते आणि पदाधिकारीही अयोध्येला रवाना झाले आहेत.
श्री राम नगरी अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी फैजाबाद आणि अयोध्येत सर्वत्र बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे अयोध्येत भगवं वातावरण पाहायला मिळत आहे.

असा असेल अयोध्या दौरा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी दोन वाजता लखनऊ विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते गाडीने लखनऊ ते अयोध्या प्रवास करतील. दुपारी ३.३०वाजता अयोध्येत त्यांची पत्रकार परिषद होईल.
त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता उद्धव ठाकरे रामललाचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास ते पुन्हा लखनऊकडे रवाना होतील.

कोरोनामुळे शरयू आरती स्थगित
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीसाठी गेल्या चार दिवसांपासून खासदार संजय राऊत अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. शरयू आरतीचंही शिवसेनेनं नियोजन केलं होतं, पण कोरोना व्हायरसमुळे गर्दी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शरयू आरती स्थगित करण्यात आली.

संजय राऊतांकडून राममंदिर परिसराची पाहणी

खासदार संजय राऊत यांनीही काल (६ मार्च) राममंदिर परिसराची पाहणी केली. शिवाय, अयोध्येतील अनेक महंतांच्या भेटी घेतल्या. लक्ष्मणकिलाधीश यांच्यासह अनेक महंत उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याचं स्वागत करत आहेत. तर, अयोध्येतील काही महंत उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध करत आहेत. शिवसेनं सत्तेत काँग्रेसची साथ सोडावी किंवा हिंदू राष्ट्रनिर्मितीबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तपस्वी छावणीच्या महंतांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments