अहिल्याबाई होळकरांनी जिर्णोद्धार केलेल्या बारवांचे पुर्नजीवनासाठी प्रयत्न


अहिल्याबाई होळकरांनी जिर्णोद्धार केलेल्या

 बारवांचे पुर्नजीवनासाठी प्रयत्न 

 भुषणराजे होळकर - पुण्यश्लोक संस्कार प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण

वेब टीम नगर,दि. २ -  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जिर्णोद्धार केलेल्या नगर जिल्ह्यातील बारवांचे पुर्नजीवन करुन त्यातील ऐतिहासिक ठेवा जपणासाठी इंदोर संस्थान व राज्य सरकारच्यावतीने प्रयत्न करणार आहोत. या कामासाठी जिल्ह्यातील समाज बांधवांनी संघटीतपणे ताकद उभी करावी, नगर जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. या दुष्काळातून शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या सर्व बारवांचे पुर्नजीवन करण्याची मोहिम आगामी काळात हाती घेणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे इंदोर संस्थानचे वारस भुषणसिंह राजे होळकर यांनी केले.
पुण्यश्लोक संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाचे महासंचालक डॉ.मंगेश देशमुख होते. यावेळी उत्तर प्रदेश अलिगड येथील सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी धनगर, माजी सभापती दादाभाऊ चितळकर, राहुरी पं.स.चे उपसभापती अण्णासाहेब बाचकर, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक कोळेकर, भाजपाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्षा सुवर्णाताई पाचपुते, रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर, उत्तम इलेक्ट्रीकल्सचे संचालक उत्तम सरगर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना होळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी इंदोर संस्थानच्या गादीवर असतांना देशभरात अनेक लोकाभिमुख कार्य केले. १२ जोर्तिलिंगापैकी पाच ज्योर्तिलिंगांचा जिर्णोद्धार केला. अनेक गावांमध्ये अन्नछत्र उभारले. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी, बारव व विहिरी बांधल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे जन्मगांव नगर जिल्ह्यातील चौंडी येथील असल्यामुळे या जिल्ह्यातील बारव व अन्नछत्र यांना गतवैभव मिळवून देण्यासाठी होळकर संस्थांन व राज्य सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सांगितले.
प्रास्तविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपट महारनवर यांनी संस्थेच्यावतीने वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, एडस् जनजागृती अभियान, पथनाट्य आदिं समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगून समाजातील तळागाळात काम करणार्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा, शिक्षण, पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ आयोजित केला असल्याचे सांगून प्रतिष्ठानच्यावतीने  गेल्या 14 वर्षापासून प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी पुणे येथील महानिर्मितीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रंगनाथ भोडवे, बीएसएनएलचे उपमंडल अभियंता वसंत दातीर, सुप्रसिद्ध आर्थोतज्ञ डॉ.राहुल पंडित, न्यू महाविद्यालयातील प्रा.चंद्रकांत वाव्हळ, पुण्याच्या अहिल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शेंडगे, जय मल्हार युवा प्रतिष्ठानचे युवराज खटके, राष्ट्रीय समाज पक्षाचे भानुदास हाके, पोपट गुलदगड, गणेश हाके, उषा शेंडगे, टीव्ही९चे जिल्हा प्रतिनिधी कुणाल जायकर, प्रेस फोटोग्राफर राजु खरपुडे, नाना डोंगरे, जिल्हा विकास बाल प्रकल्प अधिकारी विजयमाला माने, दिपक बडवे, आदर्श माता इनामदार रशिदा रज्जाक, सुखदेव बलमे, देवीदास वावरे, छायाताई शिंदे, सरपंच सुनिता सरग, स्वाती कर्हे, विक्रम कोळपे, योगिता पठारे, श्रीधर वीर, अनिल केसकर,सुजाता भांबळ, गोरख शिंदे, रमेश व्हरकटे, भगवान मंचरे, छाया मुन्ने, संतोष शिंदे, तुकाराम चिंधे, छाया शिंदे, गणेश चौरे, संगीता भापसे, हिरा औटी, दादासाहेब पारखे, विकास हंडाळ, अनिल खुडगे, अप्पासाहेब शेजाळ, गणेश कर्हे, रेश्मा पटेल, हभप राऊत, पुजा गडदे, निलेश शेंडगे  आदी मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबासाहेब नर्हे यांनी केले तर आभार प्रतिष्ठानच्या सचिव सौ. वैशाली पिसाळ यांनी मानले.
 

Post a Comment

0 Comments