गुंतता हृदय हे .....गुंतता हृदय हे .....

वेब टीम नगर ,दि.७-तसं आपण एकमेकांना नेहमीच भेटतो पण आपल्या नकळत आपल्याला कोणीतरी आवडायला लागतं आपल्या नकळत आपण कुठे तरी त्या आवडत्या व्यक्तीकडे ओढले जायला लागतो .आपलं मन आपल्या का हा तर  राहात नाही .गुंतता हृदय हे ...अशी अगदी प्राथमिक  अवस्था असते प्रेमाची .
आपलं प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा येतोय रोज डे ,चॉकलेट डे, प्रपोज डे ,हग डे , किस डे अशाच दिवसांबरोबर येणारा व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आठवडय़ातला शेवटचा दिवस यासाठी बाजारात अगदी पहिल्या दिवसांपासूनच जय्यत तयारी सुरू आहे
निरनिराळया प्रकारचे चॉकलेट्स बाजारात उपलब्ध असून तोंड गोड करण्याबरोबर त्या आठवणी सुगंधी करण्याच्या निमित्ताने कित्येक प्रकारचे गुलाबही प्रेमी उगला च्या दिमतीला हजर होत आहेत अगदी सुगंधी फुलांपासून ते गुलाबाच्या पाकळ्यांवर आपल्या प्रियकर प्रेयसीचे नाव करून देणे इतपत तंत्रज्ञान ही उपलब्ध आहे .नुसते चॉकलेट गुलाबांनी भागात नसल्याने आपल्या भावनांना शब्दरूप देण्यासाठी प्रेमाचा मजकूर अगदी थोडक्या शब्दात मांडणारी भेटकार्डही आपल्या भावनाशील मनाला भुरळ घालतील शब्दरूप आलेल्या भावनांना सुगंधांचे कोंदण देण्यासाठी निरनिराळी सुगंधी परफ्युम आणि अन्य भेटवस्तूंचा सध्या बाजारात रेलचेल दिसते आहे.

Post a Comment

0 Comments