'लव आजकल' चित्रपटाच्या प्रमोशन साठी कार्तिक-साराचे फोटो शूट

 'लव आजकल' चित्रपटाच्या प्रमोशन साठी 

कार्तिक-साराचे फोटो शूट 

वेब टीम मुंबई ,दि.८ -सारा अली खान आणि कार्तिक आर्यन आपला आगामी चित्रपट 'लव आजकल'च्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. यावेळी दोघांची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळाली.ती  तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता यावेळी  दोघेही एकत्र पोज देताना दिसून आले.सारा अली खान पांढऱ्या आणि लाल रंगाच्या स्ट्रीप्सच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खुलून दिसत होती. कार्तिक आर्यनही पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फ्लोरल जॅकेटमध्ये उठून दिसला . यादरम्यान सारा अली खान येथे फोटोग्राफर्सना पोज देतानाही दिसून आली. दरम्यान, दोघांचा आगामी चित्रपट 'लव आजकल'चा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.चित्रपटाची अनेक गाणीही रिलीज झाली असून त्यामधील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. 'लव आजकल' हा चित्रपट व्हेलेंटाइन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे. याचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments