बुद्धीची क्षमता वाढविण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी

   

 बुद्धीची क्षमता वाढविण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी

 मोहनलाल मानधना -हिंदसेवाच्या प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलनात ''महाराष्ट्राची लोकधारा'' चे दर्शन                                                     
वेब टीम नगर,दि. ३-स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणीच आहे.स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो.सध्याच्या मुलांना प्रश्न विचारल्यावर मोबाईल गुगलवर सर्च करून ताबडतोब उत्तरे देतात.परंतु मोबाईल व टीव्हीमुळे मिळणारे ज्ञान हे तात्पुरते स्वरूपाचे असते.विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे.थोर व आदर्श व्यक्तींची आत्मचरित्रे वाचल्यास प्रेरणा मिळेल.बुद्धीची क्षमता वाढविण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी.असे प्रतिपादन उद्योजक मोहनलाल मानधना यांनी केले.                                                                                               
सावेडी येथील माउली सभागृहात बागडपट्टी येथील हिंदसेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.उद्योजक मोहनलाल मानधना यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा,माजी मानद सचिव सुनील रामदासी,उपकार्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी,रामकरण सारडा वसतिगृहाचे अध्यक्ष  श्यामसुंदर सारडा ,शाळेचे अध्यक्ष  मधुसूदन सारडा, विष्णूशेठ सारडा,शालेय समिती सदस्य रवींद्र गुजराती, सचिन चोपडा,मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे, शिक्षक प्रतिनिधी मनीषा जंगम,विद्यार्थी प्रतिनिधी सूरज जगताप व माही आल सम,आदींसह विद्यार्थी,पालक,शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधी उपस्थित होते.                                                         
सुनील रामदासी म्हणाले कि,ज्या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले त्यांचे अभिनंदन.विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सहभागी होऊन विविध कला गूण सादर करावेत.                                                                                                               
प्रा.शिरीष मोडक म्हणाले कि,हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेने नेत्रदीपक यश मिळवले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत व स्कॉलरशिप परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे.त्याचे श्रेय विद्यार्थी व पालकांचे आहे.शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे व अध्यक्ष  मधुसुदन सारडा यांच्या प्रयत्नाने शाळेची प्रगती होत आहे.
प्रास्तविकात अध्यक्ष  मधुसुदन सारडा म्हणाले कि,डिजिटल क्लासरूम,अत्याधुनिक प्रयोग शाळा ,ऍक्टिव्हिटी सेंटर,संगणक कक्ष,स्पर्धा परीक्षेची तयारी अश्या अनेक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.                                                                                                   
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी ''महाराष्ट्राची लोकधारा'' गणेश वंदना,आदिवासी नृत्य,शेतकरी नृत्य,लोकनृत्य,  महाराष्ट्राची परम्परा,देवीचा गोंधळ,जेजुरीचा खंडेराया,शंकरा रे शन्करा अश्या लयबद्ध मराठी गीतांवर ताल धरला.शाळेतील शिक्षकांनीही या स्नेहसंमेलनात सहभागी होऊन नृत्य सादर केले.                                                       मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.     
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी ब्रह्मे यांनी केले.तर आभार मनीषा साळी यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments