‘रिव्हिझीटींग गांधी’ या राष्ट्रीय परिषदेत अहमदनगर महाविद्यालयाचा सहभाग

 ‘रिव्हिझीटींग गांधी’ या राष्ट्रीय परिषदेत

 अहमदनगर महाविद्यालयाचा सहभाग

   वेब टीम नगर,दि. १२ -  ऑर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉर्मस मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड पुणे या महाविद्यलयाने आयेाजित रिव्हिझीटीं गांधी या राष्ट्रीय परिषदेला अहमदनगर कॉलेज, अहमदनगर या महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी सहभगी होवून शोधनिंबधाचे वाचन केले. 
     समाजशास्त्र विभागातर्फे विभागप्रमुख डॉ.समीर महोपात्रा यांनी ‘‘ गांधी आणि जागतिक शांती’’ व डॉ.रविंद्र मते यांनी ‘‘ गांधीजीचे विचार व जागतिक शांतता’’ या शोधिनिबंधाचे वाचन केले. तसेच प्रा.मयुर रोहोकले हे परिषदेते सहभागी झाले. श्रद्धा ढवळे हिने ‘ भारताचे गांधी’, सबील सय्यद याने ‘ गांधीजीची ग्रामीण विकासाची संकल्पना’  या शोधनिंबधाचे वाचन केले. तसेच विद्या बनकर, रविना बसोड, दिपक शिरसाट, हर्षद कासार, अनास शेख यांनी सहभाग नोंदवला.
     विद्यार्थी संशोधनकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस, विभागप्रमुख डॉ.समीर महोपात्रा, डॉ.रविंद्र मते, प्रा. मयुर रोहोकले यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments