शाळा बंद करण्याचा निर्णय चुकीचा


शाळा बंद करण्याचा निर्णय चुकीचा 

 खा. शरद पवार - शिक्षक भारतीचे वडाळ्यात दणदणीत राज्यव्यापी अधिवेशन
वेब टीम नगर,दि. १२ - शिक्षण हा समाज व्यवस्थेचा कणा असून  तो शाळांमध्ये मजबुत होतो. त्यामुळे राज्यात शाळा वाढवायला हव्यात. त्या चालवायला हव्यात. पण भाजप सरकारच्या काळात शाळा चालविण्या ऐवजी त्या बंद करण्याचा करंटे  पणा केला. पट संख्येचे कारण देत पाच वर्षात त्यांनी १३ हजाराहून अधिक शा ळा बंद केल्या. यावरुन शाळा बंद करायला. नव्हे तर चालवायला डोके लागते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपाला लगावला.
शिक्षक भारतीचे पहिलेच राज्यव्यापी अधिवेश वडाळा मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडले. त्यावेळी शिक्षकांच्या प्रश्‍नांवर शिक्षक भारतीच्या शिष्टामंडळासह आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. गेली पाच वर्षे सरकार दरबारी आमची कुंचबना झाली. आम्हा कोणी वाली नव्हाता. पण आता महाविकास आघाडीचे सरकार आल्याने शिक्षकांना न्याय मिळायला हवा. अशी मागणी शिक्षक भारतीच्या संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी केली.
जुनी पेन्शन योजना सुरु झाली पाहिजे, शाळांना व तुकड्यांना अनुदान दिले पाहिजे, उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाच्या टप्प्यावर आणले पाहिजे,  शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देतानाच विचार केला पाहिजे. त्या सुरू केल्यानंतर त्यांना अनुदान न देणे, शाळा बंद करणे हे योग्य नाही. शिक्षकांचे प्रश्‍न खूप आहेत, ते सगळे लगेच सोडवता येतील असे नाही. मात्र काही महत्त्वाचे मुद्दे लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करू. त्याबाबत शिक्षणमंत्री, अर्थमंत्री यांच्याशीही चर्चा करण्यात येईल, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितले. शिक्षक भारतीच्या अधिवेशनात पवार आणि खासदार संजय राऊत यांची पूर्वीच्या शासनाने घेतलेल्या निर्णयांचा समाचार घेतला
'आम्ही धडा शिकवला’
शिक्षक अधिवेशनामध्ये राजकीय टोलेबाजीही रंगली. ‘तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी गेली पाच वर्षे जसा संघर्ष करत होतात तसाच आम्ही सत्तेत राहून करत होतो. पाच वर्षांत इतिहास बदलला, धडे बदलण्यात आले. मग आम्ही काय केले तर सरकारच बदलले. धडे बदलणार्‍यांना घरी बसवले,’ असे शिवसेनेचे खा. संजय राऊत म्हणाले. ‘प्रश्‍न सोडवण्यासाठी काही बदल करण्याची आवश्यकता होती असे लक्षात आले. हा धडा असा आहे. अमुक धडयात हे आहे असे सतत समजावूनही उपयोग होत नसेल तर अखेर ‘धडा’ द्यावा लागतो किंवा धडा शिकवावा लागतो. पण धडा एकट्याने शिकवता येत नाही. म्हणून मग आमची नजर संजय राऊत यांच्याकडे गेली,’ अशी टिप्पणी पवार यांनी केली.
यावेळी राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शिक्षणाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे शिक्षणाची घडी नीट बसवणे आवश्यक आहे. शिक्षक गुलाम नाहीत, मात्र त्यांना राजकीय सेवकासारखा वागवण्याचा प्रयत्न मागील पाच वर्षेकेला गेला. तुमच्या मागण्यांचे मंत्रालयाबाहेर फलक लावा म्हणजे मुख्यमंत्र्यांना या मागण्या किती गंभीर आहेत ते कळेल. शिक्षकांच्या वेदना ते समजून घेतील आणि पुढच्या अधिवेशनाला फलक लावण्याची वेळ येणार नाही
या अधिवेशनाला शिक्षक भारतीचे नेते तथा राज्य सचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, प्राथमिक राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे,  विजय कराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, संपत वाळुंज, नवनाथ घोरपडे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, रोहिदास चव्हाण, किसन सोनवणे, इकबाल सय्यद, राजेंद्र जाधव, संजय पवार, प्रमोद दिवेकर, सुदर्शन ढगे, गंगाराम साबळे, संभाजी पवार, संतोष मगर, अनिल लोहकरे, रामनाथ थोरात, बाळासाहेब थोरात, संतोष देखमुख, योगेश हराळे, गोरे , लहामटे , काशिनाथ मते, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, सचिव विभावरी रोकडे, शंकुतला वाळुंज आदी यावेळी मुंबई येथील शिक्षक भारतीच्या राज्यव्यापी अधिवेशनाला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments