गडकिल्ल्यांवर गैरवर्तन केल्यास ६ महिने कारावास
वेब टीम मुंबई ,दि . ३ - गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्यांवर यापुढील काळात सहा महिने सश्रम कारावास आणि दहा हजाराचा दंड करण्याचा नियम शासनाने केला आहे .गड किल्ल्यांवर दारू पिणार्यांवर सहा महिने सश्रम कारावास दहा हजाराचा दंड व पुन्हा गुन्हा केल्यास एक वर्षाचा कारावास अशी शिक्षा दारूबंदी महाराष्ट्र अधिनियम पंचांशी कलमान्वये होणार आहे .गडकिल्ल्यांवर ओपन हॉटेल्स देशी दारुच्या बारना परवानगी देणार्यांवर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया दुर्गप्रेमींनी केली
0 Comments