जिद्दीने शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घ्यावी


जिद्दीने शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपासून प्रेरणा  घ्यावी 

 अतुल जैन- कोचिंग क्लास च्या विद्यार्थ्यांची बाबावाडीत सहल
    वेब टीम  नगर,दि. २ - आई वडिलांच्या कुशीत आणि प्रेमळ  छत्राखाली जाते ते बालपण. परंतु  कित्येक  बालकांच्या नशिबात असे आई वडिलांचे प्रेमळ छत्र नसते. मग अश्या या बालकांना अनाथाश्रम किंवा बाबावाडी सारख्यासंस्थाचांच आधार असतो. तेच त्यांचे घर आणि तेच त्यांचे कुटुंब बनते.अश्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपासून प्रेरणा मिळावी आणि शिक्षणा बरोबर मुलांवर सुसंस्कार घडावेत या उद्देशाने जैन कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना बाबावाडीची सहल घडूवून आणली आहे, असे प्रतिपादन जैन कोचिंग क्लास चे संचालक अतुलजैन यांनी केले.
      स्व. शोभाबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने नगरच्या जैन कोचिंगक्लासेस मधील तिसरी ते सहावीच्या विद्यार्थांना बाबावाडीची सहल घडवण्यात आली. तसेच बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनावश्यक वस्तू आणिधान्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात क्लासच्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला. यावेळी जैन कोचिंग क्लासचे संचालक अतुल जैन आणि संचालिका  सोनाली जैन, शिक्षिका हर्षिताशर्मा , योगिता दायमा ,बाबावाडीच्या अधीक्षिका सुमन कांबळे आदिउपस्थित होते.
     सोनाली जैन म्हणाल्या, स्व.शोभाबाई जैन यांच्या पुण्यतिथीनिमित्तशोभाबाई जैन फाऊंडेशन आणि जैन कोचिंग क्लासेस तर्फे दरवर्षी विविधसमाजपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. याआधी वृद्धाश्रम अनाथाश्रम मध्येफळ वाटप, धान्य वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान असे विविधउपक्रम राबवले आहेत. यावर्षी क्लासच्या विद्यार्थ्यांना बाबावाडी यासामाजिक संस्थेबद्दल माहिती देऊन तेथे रहात असलेल्या विद्यार्थ्या साठीअसलेल्या स्वयंपाक घर , प्रार्थना हॉल ,रूम यांची प्रत्यक्ष भेट देऊनमाहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना विविध वस्तू आणि धान्याचे वाटप करण्यात आले क्लासच्या विद्यार्थ्यांना गंगा उद्यानमध्ये नेण्यात आले.तेथे  विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा आनंद लुटला. तिथे क्लास मधीलखालील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता तिसरी ते सहावी - वर्धिनी अट्टल, संस्कृती दरेकर, समृध्दी बडे, रुद्राक्ष दराडे,संचीता नन्नवारे. इयत्ता सातवी ते दहावी - चैतन्य गांगर्डे, अमन सय्यद,चैतन्य सदफळ, अक्ष गांधी आदीचा  सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments