विजेता क्लबच्या सदस्यांनी अरणगाव येथील जि. प. शाळेला पाण्याच्या दोन मोटारी दिल्या


विजेता क्लबच्या सदस्यांनी अरणगाव येथील जि. प. शाळेला पाण्याच्या दोन मोटारी दिल्या

वेब टीम नगर ,दि. २७-उन्हाळ्याची चाहूल  लागू लागली आहे .त्यातच ग्रामीण भागात याची झळ जास्तच जाणवते  अरणगाव येथील जिल्हा  परिषदेच्या शाळेची नेमकी हीच  गरज ओळखून नगरच्या विजेता क्लबच्या  सदस्यांनी वर्गणी करून या शाळेला दोन  पाण्याच्या मोटारी नुकत्याच भेट दिल्या.अरणगाव येथील एका छोटेखानी कार्यक्रमात अवतार  मेहेरबाबा ट्रस्टचे ट्रस्टीं रमेश  जंगले व सरपंच मोहन गहिले  याना विजेताक्लबचे  अमोल शिंगी ,पियुष लुंकड ,हर्ष बोरा यांनी या पाण्याच्या मोटारी देणगी दाखल सुपूर्त केल्या  .स्वर्गीय संजय बोरा यांच्या समरणार्थ सुरु करण्यात आलेल्या या क्लबने अनेक सामाजिक ,शैक्षणिक ,विविध खेळांच्या स्पर्धा अश्या समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन केले आहे . या कार्यक्रमाप्रसंगी  विजेताचे सदस्य ओजस बोरा ,गौरव गुगळे ,प्रफुल्ल मुथा,तसेच अरणगाव पंचायत  समितीचे सदस्य दीपक कार्ले ,नवनाथ गहिले ,लहू अजबे,अंबादास कोलहापूरे,बाप्पू गहिले, राजाभाऊ शेळके ,सचिन शेफर्ड ,उपस्थित होते..रमेश जंगले यांनी या प्रसंगी विजेता क्लबच्या   सदस्यांचे आभार मानले.खऱ्या अर्थाने भर उन्हाळ्यात या शाळेतील बालकांना या मोटारीच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे,सामाजिक जाणिवेतून गरजवंतांना मदत करण्याचे पुण्याचे कार्य आपण करत आहात. आता पाणी मिळणार यामुळे शाळेतील मुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे असे सांगून विजेत्या क्लबच्या  सदस्यांचा जंगले यांनी सत्कार केला .हर्ष बोरा यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments