जेष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे यांचे७०व्या वर्षात पदार्प
वेब टीम नगर,दि. २७- येथील जेष्ठ पत्रकार प्रकाश गोविंदराव भंडारे यांचे२८ फेब्रुवारी रोजी ७० व्या वर्षात पदार्पण होत आहे. त्यानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंत, पत्रकार, राजकीय, अर्थतज्ञ, सहकारअग्रणी, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आजी माजी राज्यपाल व नातेवाईकांनी भंडारे यांचे अभिनंदन केले आहे.जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक प्राध्यापक हिंदी उर्दू चे विशेष शिक्षक कै.गोविंदराव भंडारे व कै रुक्मिणीबाई भंडारे यांचे ते जेष्ठ पुत्र आहेत. घरगुती धार्मिक कार्यक्रमाने त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, प्रख्यात हॉटेल व्यावसायिक दत्ताशेठ व सुरेश गायकवाड, अशोक भुजबळ व निवृत्त पोलीस अधीक्षक(गुप्त वार्ता) सुभाष महाजन यांनी पत्रकाद्वारे हि माहिती दिली.
0 Comments