१ मार्चला वाघोलीत राज्यस्तरीय मराठा वधु-वर परिचय महामेळावा


१ मार्चला वाघोलीत राज्यस्तरीय मराठा वधु-वर परिचय महामेळावा


    वेब टीम नगर,दि. २७ - सकल मराठा समाज, ज्येष्ठ नागरिक संघ वाघोली व राजमाता जिजाऊ मराठा वधु-वर मंडळ अहमदनगर  आयोजित, राज्यस्तरीय मराठा  वधू-वरांचा थेट-भेट परिचय महामेळावा रविवार दि.  १ मार्च सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत या वेळेत वाघोली शहरातील वाघेश्‍वर पॅलेस मंगल कार्यालय नगर- पुणे महामार्ग, वाघोली ता. हवेली येथे होत असल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक बाळासाहेब सातव, विठ्ठलराव गुंजाळ यांनी  दिली.
      या मेळाव्याचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार अ‍ॅड.अशोकबापु पवार यांच्या हस्ते  होणार असून आमदार सुनिल टिंगरे, सभापती पंढरीनाथ पठारे, वाघोलीचे सरपंच सौ.वसुंधराताई उबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे मेळाव्याचे संयोजक डॉ.उषा मोरे यांनी सांगितले.
      या लग्नसराईत शेवटचा राज्यस्तरीय मराठा  वधू-वर परिचय महामेळावा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे वाघेश्‍वर पॅलेस मंगल कार्यालयात होत आहे. त्यामुळे आपल्याला  आपल्या इच्छा प्रमाणे जोडीदार शोधता येतो या मेळाव्यात नोकरीच्या निमित्ताने पुणे शहर व परिसरात स्थायिक तसेच अहमदनगर, बीड, जालना, नाशिक, ठाणे, मुंबई, सातारा, सांगली व इतर जिल्ह्यातील वधू-वर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात अनुरूप वधूवरांना त्यांची ओळख, माहिती सांगून जोडीदाराबद्दल असणार्‍या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत तसेच मराठा समाजाच्या उपवर वधू वरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोरदार निवडता येणार असून या मेळाव्यात वधूवरांनी स्वतःचा फोटो व बायोडाटा पालकांनी हजर राहावे आई-वडिलांनी एकटे येऊ नये असे आवाहन अहमदनगर येथील राजमाता जिजाऊ मराठा वधू-वर मंडळाचे मार्गदर्शक व मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य  विठ्ठलराव गुंजाळ, जयकिसन वाघ, डॉ.अभिमन्यू कोठुळे, डॉ.गजानन पडघन, डॉ.सतिश आळंदकर, धनंजय सांबारे, बाळासाहेब कोळगे, व्यंकटेश बोडखे, वसंतराव मुठे, आसाराम नलगे, अशोकराव ढोले, अशोकराव बनकर, बाळासाहेब भोर आदींनी केले आहे.
     अहमदनगर शहरातून सुरू झालेली राज्यस्तरीय मराठा वधु- वर थेट-भेट परीचय मेळाव्याची लोक चळवळ हि संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरली असून राज्यात लोकसहभागातून मेळाव्याची शृंखला सुरू झाली असून नुकताच राजमाता जिजाऊ मराठा वधू-वर मंडळाचा २५ व राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा २९ डिसेंबरला मोठ्या थाटात शनिशिंगणापूर, ता.नेवासा  येथे पार पडला त्याच धर्तीवर  वाघोली ता. हवेली जि. पुणे येथे होत आहे. ज्येष्ठ नागरिक संघ वाघोली व स्थानिक समाज बांधवांच्या सहकार्यातून जय्यत तयारी मेळाव्याची सुरू आहे.
     अधिक माहितीसाठी मेळाव्याचे समन्वयक विठ्ठलराव गुंजाळ (मो९८२२०६६३८१), जयकिसन वाघ (मो.९१३०९५०९९९) व डॉ.उषा मोरे (मो.९५४५८४४४१५), बाळासाहेब सातव (९९२२५०१४०७) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments