अहमदनगर कॉलेजच्या प्रशांत हजारे याचे ‘जिओ फेस्ट 2020’ स्पर्धेत यश

नगर कॉलेजच्या प्रशांत हजारे याचे ‘जिओ फेस्ट 2020’ स्पर्धेत यश

     वेब टीम नगर,दि. २६ - जिओ-फेस्ट 2020 स्पर्धा एस. पी. कॉलेज भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुनील गायकवाड व त्यांचे सहकारीवृंद यांच्या मार्गदर्शनाने  उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेत अहमदनगर कॉलेज भूगोल स्पेशलचा विद्यार्थी प्रशांत हजारे याने सहभाग घेऊन भौगोलिक दृष्टीकोनातून आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्याच प्रमाणे याच कार्यक्रमादरम्यान आयोजित परफेक्ट जीओग्राफार स्पर्धेतही सहभाग नोंदविला. त्याच्या या यशाबद्दल अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर . जे. बार्नबस यांनी त्याचे अभिनंदन केले. प्रशांत हजारे याला भूगोल विभाग प्रमुख प्रो. डॉ. माया उंडे, प्रा. जी. एल. उंडे, डॉ. शरद बोरुडे, प्रा. माधव जाधव, प्रा. अजय काकडे, प्रा. दादासाहेब जवरे, प्रा. रजनी अडकमोल यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments