महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या
उपाध्यक्षपदी माऊली गायकवाड यांची निवड
वेब टीम नगर,दि.२३ - अहमदनगर जिल्हा ओबीसी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांची औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड जाहिर करण्यात आली.
राज्यस्तरीय अधिवेशनात नाभिक समाजाच्या तसेच ओबीसी बारा बलुतेदार महासंघातील विविध सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. जिल्हाध्यक्षपदावर काम करताना माऊली गायकवाड यांनी नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावागावात ओबीसी बारा बलुतेदारांची वज्रमुठ तयार केली सर्व समाजासाठी महासंघाचे विचार, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्य, ध्येय, धोरणे, तळगाळातील लोकांपर्यत घराघरात पोहचविले. त्यांच्या या कार्याची दखल अधिवेशनात घेत महाराष्ट्र नाभिक महासंघाचे तसेच ओबीसी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी गायकवाड यांच्यावर हि नवीन जबाबदारी दिल्याने त्यांच्या समर्थकांनी निवडीचे स्वागत केले.
राज्यस्तरीय अधिवेशनात दळे यांचे हस्ते गायकवाड यांना नियुक्तीचे पत्र देऊन समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन समाजाचे संघटन कौशल्य वाढवावे अशा शुभेच्छा दिल्या. माऊली गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने उपाध्यक्षपद देऊन दळे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ करुन दाखविन. ओबीसी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष पद व राज्याचे उपाध्यक्षपद दोन्ही जबाबदार्या महत्वाच्या असल्याने माझ्या महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी पार पाडीन असे सांगितले.
माऊली यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून अनेकानी त्यांचे अनिभनंदन केले आहे.
0 Comments