पारस गुंदेचा यांची मारवाडी-गुजराती मंचच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

पारस गुंदेचा यांची मारवाडी-गुजराती मंचच्या

 जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

    वेब टीम  नगर,२३ - नगरमध्ये  मारवाडी व गुजराती समाज मोठ्या प्रमाणात आहे. समाजातील युवकांचे संघटन करुन   पारस गुंदेचा यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. त्यांच्या कार्यात आमचेही सहकार्य राहील, असे प्रतिपादन नगरसेवक गणेश भोसले यांनी कले.
     अ.भा.मारवाडी गुजराती मंचच्या जिल्हाध्यक्षपदी पारस गुंदेचा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा साई मॉर्निंग ग्रुपच्यावतीने नगरसेवक गणेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  किशोर चोपडा, आनंद मुथा, राजेंद्र भंडारी, किशोर गांधी, किशोर श्रीश्रीमाळ, संजय आगरकर, रणजित कुटे, नानासाहेब हराळ, प्रकाश सराफ, प्रकाश लोढा, सुभाष दायम आदि उपस्थित होते.
     याप्रसंगी पारस गुंदेचा यांनी सत्काराबद्दल साई मॉर्निंग ग्रूपचे आभार मानून, समाजातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्‍नांबाबत विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले.
     याप्रसंगी अनेकांनी पारस गुंदेचा यांचे अभिनंदन केले. शेवटी आनंद मुथा यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments