संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फेरविवारी स्वच्छता अभियान

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या नगर शाखेतर्फे रविवार दि२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १२ यावेळेत जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) च्या परिसरात सफाई अभियान राबविले जाणार असून सकाळी ८ वाजता हॉस्पिटलच्या प्रवेशव्दार जवळ निरंकारी सेवादलचे महिला व पुरुष सदस्य तसेच चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक एकत्रित होतील. ‘ सामुहिक प्रार्थना’ होईल. व साफसफाईला सुरुवात करतील. उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
उल्लेखनीय बाब म्हणजे संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीरे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, वृक्षारोपण, नदी-तलाव किनारे स्वच्छता, रेल्वे स्थानक स्वच्छता आदी अभियान वर्षभर, ठिकठिकाणी राबविले जातात. याकार्याची दखल घेत, भारत सरकारने संत निरंकारी मिशनला वेळोवेळी अनेक पारितोषिके देऊन सन्मानित केले आहे.
तरी सफाई अभियानात नागरीकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.
0 Comments