महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हास्तरीय कार्यगौरव पुरस्कार


महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हास्तरीय कार्यगौरव पुरस्कार

सुनिल वाघमारे, श्यामराव पिंपळे, पत्रकार सुनिल पंडित, डॉ. किरण तुणे, सदाभाऊ शिंदे, सुखदेव मर्दाने , शिवाजी दळवी यांना जाहिर

    वेब टीम नगर,दि. २२ - महाराष्ट्र नाभिक महामंडळ व नाभिक समाज ट्रस्ट अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या समाज बांधवांना ‘कार्यगौरव पुरस्कार’ देवुन सन्मानित करण्यात येणार असुन हे पुरस्कार जाहिर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांनी दिली.
     अहमदनगर येथील संत सेना महाराज सांस्कृतिक भवन येथे झालेल्या समाज बांधवाच्या बैठकीत हे पुरस्कार जाहिर करण्यात आले. या बैठकीची अध्यक्षस्थानी प्रदेश कार्यकारणी सदस्य व जिल्हा मार्गदर्शक विकास मदने हे होते. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हास्तरीय कार्यगौरव पुरस्कार    सुनिल वाघमारे ( सामाजिक कार्यगौरव, अ. नगर ) श्यामराव पिंपळे ( राजकीय कार्यगौरव, वडगाव गुप्ता ) पत्रकार सुनिल पंडित ( उत्कृष्ठ पत्रकारिता व समाजकार्य गौरव, कुकाणा ) डॉ. किरण तुणे ( वैद्यकीय कार्यगौरव ) सुखदेव मर्दाने (कला कार्यगौरव, पाथर्डी ) तर सदाभाऊ शिंदे व  शिवाजी  दळवी यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार जाहिर केले आहेत. या सर्व पुरस्कारार्थींना मार्च माहिन्यात आयोजित पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. असा निर्णय घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
     यावेळी जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, नाभिक समाज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, नाभिक महामंडळ युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद दळवी, शहराध्यक्ष दिलीपराव शिंदे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.  जाहिर करण्यात आलेले पुरस्कार हे जिल्हास्तरीय असुन सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. असे ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी सांगितले.जगन्नाथ झेंडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments