अहमदनगर महाविद्यालयाच्या वृषाली मेंगवडेचे वकृत्व स्पर्धेत यश


अहमदनगर महाविद्यालयाच्या  वृषाली मेंगवडेचे वकृत्व स्पर्धेत यश

  वेब टीम नगर,दि. २० -  वकृत्व परिषद, महाराष्ट्र राज्य व गणेशभाऊ आनंद युवा मंच आयोजित सहकार महर्षी कै.शिवाजीराव नागवडे (बापु) यांच्या स्मरणार्थ ‘ महाराष्ट्राचा महावक्ता’ ही राज्यस्थरीय वकृत्व स्पर्धा नुकतीच नगर येथे आयोजित करण्यात आली होती.  स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थींनी वृषाली सुरेंद्र मेंगवडे (एम.एस.सी.आय.आय.) हिने यशस्वी रित्या सहभागी  होऊन उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले.
     या यशाबद्दल कु.वृषाली मेंगवडे हिचा प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वकृत्व व वादविवाद मंडळाचे प्रमुख प्रा.अशोक बोरुडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments