छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास प्रेरणादायी
जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे - विश्वहिंदुपरिषद, बजरंगदल तर्फे शिवजयंती उत्सव साजरावेब टीम नगर ,दि. १९ -छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.आज देशभर शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते.शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा व महाराजांना विनम्र अभिवादन करतो.स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या मनामनात अखंडतेची ज्योत पेटवली.महाराष्ट्रात ज्या लढाया झाल्या त्या शूर पराक्रमांची साक्ष आजही महाराष्ट्रातील किल्ले देत आहेत .मूठभर मावळे असताना देखील महाराजांनी शत्रुसैन्याला धूळ चारली.तान्हाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे,शिवा काशीद,जिवा महाले,संताजी,धनाजी हे शूर सरदार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे आहेत.श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन विश्वहिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे यांनी केले.
विश्वहिंदुपरिषद व बजरंगदलाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी नगर बसस्थानक येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना विश्वहिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,मठ मंदिर समितीचे संपर्क प्रमुख शहरमंञी अनिल देवराव,शहर सहमंत्री राजेंद्र चुंबळकर,सत्संग शहर प्रमुख सागर रोहोकले आदी उपस्थित होते.
0 Comments