गरजूंना प्रत्येकाने कर्तव्य भावनेने मदतीचा हात द्यावा
आ.संग्राम जगताप - ब्रिज ऑफ होप संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटपवेब टीम नगर,दि. १९ - निराधार, वंचित, गरजू हे आपल्या समाजाचेच एक घटक आहेत. त्यांना आधार देवून त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलविण्याचे काम प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून केले पाहिजे. यासाठी पुढाकार घेत असलेल्या संस्था, संघटनांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. यातूनच संपूर्ण समाज आनंदी, समाधानी होईल, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
बिलिव्हर्स इस्टर्न चर्च अंतर्गत ब्रिज ऑफ होप संस्थेच्यावतीने सिध्दार्थनगर, माळीवाडा येथील संस्थेतील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप नुकतेच आ.जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रेव्ह.शमुवेल भिंगारदिवे, भिंगार राष्ट्रवादीचे संजय सपकाळ, डी.जी.साठे, रेव्ह.मनिष गायकवाड, ब्रिज ऑफ होपच्या सुषमा कांबळे (क्षत्रिय), वर्षा पाखरे, समिना पठाण, जेमिमा राग्रुती, अरूण साळवे आदी उपस्थित होते.
मनिष गायकवाड म्हणाले की, ब्रिज ऑफ होप हि संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. गरजू व होतकरु मुलांना अन्न, शालेय साहित्याचे वाटप सातत्याने करण्यात येते. या कार्यातून संस्था अधिकाधिक गरजूपर्यंत पोहचण्याचा व त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
0 Comments