शिवरायांची उदारता राज्यकर्त्यांनी आंगिकारावी



शिवरायांची  उदारता राज्यकर्त्यांनी आंगिकारावी 

डॉ.सुनिल कवडे - छत्रपती शिवाजी महाराज जयंती-२०२०

वेब टीम नगर ,दि. १९ - अहमदनगर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने बहुजन प्रतिपालक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस हे होते. याप्रसंगी केंद्राचे संचालक डॉ.सुनील कवडे यांनी शिवाजी महाराज : एक आदर्श राज्यकर्ता या विषयावर मार्गदर्शन केले.
     यावेळी डॉ. कवडे म्हणाले,  त्यांच्या मते शिवाजी महाराज हे लोकशाहीचे आद्य समर्थक होते. छत्रपती शिवराय स्वराज्य स्थापनेचा विचाराशी सहमत असणार्‍या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले. शिवाजी महाराज हे हिंदू धर्माभिमानी होते, परंतू ईतर धर्मांचा द्वेष करणारे नव्हते. ते एक आदर्श प्रशासक होते.
     यावेळी प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी अध्यक्षीय भाषणात गांधी अध्ययन केंद्रातील विविध उपक्रमांचे कौतुक केले व केंद्र अधिक समाजाभिमूख करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक डॉ. सुधीर वाडेकर यांनी केले तर आभार प्रा.विलास नाबदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.अरविंद नागवडे, प्रा.डॉ.बी.एम.गायकर, डॉ. सय्यद रज्जाक, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अरुण बळीद, राज्यशास्त्र विभागातील प्रा. फिरोज शेख ,प्रा. पूनम घोडके,  शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments