शिवरायांचा  इतिहास विद्यार्थ्यांनी स्मरणात ठेवावा

 स्वप्नील वाघ-दिव्यांगांसोबत शिवजयंती साजरी ;  : साई सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

 वेब टीम नगर,दि. १९ - छत्रपती शिवाजी महाराज हे सुधारणावादी होते; म्हणूनच भेदभाव न बाळगता ते सर्व जातीधर्मियांना बरोबर घेऊ शकले, महिलांना स्वातंत्र्य देऊ शकले आणि कर्मठ, अंधश्रद्धाळू, अनिष्ठ परंपरा नाकारु शकले. हे लक्षात घेऊन शिवचरित्रापासून प्रेरणा घ्यावी, त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांनी सदैव स्मरणात ठेवावा, असे प्रतिपादन स्वप्नील वाघ यांनी केले.
     प्रभाग क्र.२ मधील पाईपलाईन रोड, हडको वसाहतीत तपोवन रोडवरील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील दिव्यांगांसोबत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते. या उत्सवाला नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनीत पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक योगेश पिंपळे, अक्षय अकोलकर, जाकिर सय्यद, अस्लम सय्यद, सार्थक कदम, डॉ.मिनल काळे, अनिसा शेख, शोभा वाघ, सुवर्णा कदम अदि मान्यवर उपस्थित होते.
वाघ पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी तुळजा भवानी मातेवर खूप श्रद्धा ठेवली मात्र अंधश्रद्धेला त्यांनी कधीही थारा दिला नाही. शुभ-अशुभ अशा गोष्टींवर विश्‍वास ठेवला नाही. ते नेहमी सृजनशिल, सकारात्मक, प्रयत्नवादी होते. त्यामुळेच रयतेचा राजा म्हणून त्यांनी काम केले.
     यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यावर लेझिम खेळून नृत्य सादर केली. परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन त्यांचे कौतुक केले. साई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे प्रभागातील नगरसेवकांनी कौतुक केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सविता साबळे, शकुंतला कोंडा, अनिशा कोडम, गौरी दळे, मनिषा काकडे, अश्‍विता कोंडा, स्वाती जैन, अनिता भंडारी, पुजा साबळे, सुनिता बोरा व बाबासाहेब केदार विकास प्रतिष्ठान संचलित मतिमंद मुलांच्या निवासी शाळेचे सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments