भाजपतील गटबाजी




भाजपतील गटबाजीची चौकशी सुरू 

वेब टीम नगर,दि.३० - विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील काही पराभूत आणि काही विजयी उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारींची चौकशी आज सुरू करण्यात आली असून त्यात नगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांच्या  पराभवाची कारणमिमांसा होणार आहे .
जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी निवडणुकीनंतर आमदार विखे यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कडे तक्रारी केल्या होत्या, त्यात प्रामुख्याने माजी आमदार कोल्हे ,राम शिंदे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे यांचा समावेश होता नंतर आमदार राजळेनीही गटबाजीसंदर्भात विखे यांना जबाबदार धरले होते .
या सर्व प्रकरणांची चौकशी आज सुरू झाली असून आमदार कर्डिले यांच्या निवासस्थानी वरील सर्व माजी आमदारांचे जबाब लिहून घेण्याचे काम सुरू आहे .
निवडणुकीदरम्यान राज्यभरातून अनेक तक्रारी आला होता पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांनीही काही तक्रारी केल्या होत्या मात्र आज प्रामुख्याने नगरमधील तक्रारींची दखल घेण्यात आली आहे या चौकशीमधून काय बाहेर येते याबाबत उत्सुकता आहे .विधानसभा निवडणुकी संदर्भातील तक्रारींची चौकशी सुरू झाली असून पक्षाच्या अंतर्गत विचारविनयवर होवून  न्याय मिळेल अशी अपेक्षा माजी आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे .

Post a Comment

0 Comments